maharashtra shahir

‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) चित्रपटामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या भूमिकेत अतुल काळे दिसणार असल्याचा खुलासा नव्या पोस्टरमधून करण्यात आला आहे.

  ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच त्याची खूप चर्चा सुरु आहे. आज यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचं नवं पोस्टर (Maharashtra Shahir Poster Launch) समोर आलं आहे. या नव्या पोस्टरमधून चित्रपटातील आणखी एका अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या भूमिकेत अतुल काळे दिसणार असल्याचा खुलासा या पोस्टरमधून करण्यात आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)


  आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे,“ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण.. हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव ह्यांचं नातं राजकारणाच्या ही पलीकडचं होतं.. हेच नातं उलगडणार २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमात.. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर.. यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत.. अतुल काळे.”

  अतुल काळे यांनी ‘वास्तव’,‘जिस देश मै गंगा रहता है’,‘दे धक्का’ अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. तसेच अतुल काळे यांनी ‘बाळकडू’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं.

  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर केदार शिंदेंची मुलगी सना शाहीर साबळेंच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.