गौरव मोरे आता हिंदी शोमधून करणार प्रेक्षकाचं मनोरंजन, ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये धमाकेदार एन्ट्री!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर गौरव मोरे आता हिंदीतील छोटा पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे.

  काही दिवसापुर्वी ‘चला हवा येऊ द्या या’ लोकप्रिय मालिकेतील विनोदवीर कुशल बद्रिके () हिंदी विनोदी मालिकेत झळकणार असल्याचं वृत्त आलं होतं. आता पुन्हा एक विनोदवीराची हिंदी विनोदी मालिकेत वर्णी लागली आहे.  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शो मधून घराघरांत लोकप्रिय झालेला विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) आता हिंदीतील छोटा पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. गौरव मोरे हा सोनी वाहिनीवरील  ‘मॅडनेस मचाएंगे’ शोमध्ये झळकणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे.

  गौरव मोरे हिंदी मालिकेतून करणार प्रेक्षकांच मनोरंजन

   ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॅामेडी शोमधून विनोदवीर गौरव मोरेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केलं. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असे म्हणत विनोदाच्या टायमिंगमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. आता गौरव मोरे हिंदी शोमधून देखील प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास तयार झाला आहे. सोनी वाहिनीवरील  ‘मॅडनेस मचाएंगे’ या शोमध्ये आता गौरव मोरे प्रेक्षकांना हसवणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो लाँच केला. या प्रोमोत एका स्किटमध्ये गौरव मोरेसह हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके आहेत. त्यामध्ये या तिघांच्या कॉमेडीची धमाल दिसून आली आहे.  हिंदीतील कॉमेडी शोमध्ये हे त्रिकूट धमाल करणार असल्याचे दिसून येत आहे.

  गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडणार?

  ‘मॅडनेस मचाएंगे’ मध्ये काम करत असल्याने आता  गौरव महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांनी गौरवला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडू नका असाही सल्ला दिला आहे. मात्र, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, गौरव हा शो सोडणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

  चाहत्यांकडून अभिनंदनांचा वर्षाव

  गौरव मोरे आता हिंदीमधील कॉमेडी शो गाजवण्यास सज्ज झाल्याने चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या शोसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गौरव मोरे हा आगामी ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय, ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.