maharashtrachi hasyajatra new year special

‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ न्यू इयर स्पेशल (Maharashtrachi Hasyajatra New Year Special) कार्यक्रम प्रेक्षकांना ३० डिसेंबरला रात्री ९ वा. सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव, नागपूर (Nagpur) इथं या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं.

    वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला हसवणारी हास्यजत्रा नव्या वर्षाचं स्वागतही प्रेक्षकांच्या मनोरंजनानं करणार आहेत. ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ न्यू इयर स्पेशल (Maharashtrachi Hasyajatra New Year Special) कार्यक्रम प्रेक्षकांना ३१ डिसेंबरला रात्री ९ वा. सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव, नागपूर इथं या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं. हास्यजत्रेच्या कलाकारांना बघण्‍यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.

    ‘ही गर्दी नाय, नागपूरकरांचं प्रेम हाय’, असं अभिवादन प्राजक्‍ता माळीनं खास वऱ्हाडी शैलीत केलं. थेट पण मनानं निर्मळ, सुरात न बोचणारा रांगडेपणा, महाराष्‍ट्रात कार्य व जगभरात हवा करणाऱ्या लोकांचं शहर असलेल्या नागपुरात आल्‍यावर माहेरी आल्‍यासारखं वाटतं, असं सई ताम्हणकर म्‍हणाली.

    या कार्यक्रमात समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात आणि हास्यजत्रा चमूनं नागपूरकरांना खळखळवून हसवलं. ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ या कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर आणि सूत्रसंचालन करणारी प्राजक्‍ता माळी यांनी खास वऱ्हाडीत रसिकांशी संवाद साधला.

    छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि विदर्भाची कन्या ताराराणी हिच्यावर आधारित नाट्यप्रवेश या वेळी सादर करण्यात आला. मंचावरील या ताराराणीनं ‘हर हर महादेव’चा गजर करताच उपस्थित प्रेक्षकांनीही तिच्‍या सुरात सूर मिसळला. ‘इंडियन आयडॉल मराठी’मधील कैवल्‍य केजकर, जगदीश चव्‍हाण, भाग्‍यश्री टिकले यांनी गीतं सादर केली. ‘अजूनही बरसात आहे’, ‘स्वराज्यसौदामिनी ताराराणी’, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेतल्या उमेश कामत, मुक्ता बर्वे, स्वरदा थिगळे आणि मधुरा वेलणकर यांनी या वेळी प्रेक्षकांशी सवांद साधला.