‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ अभिनेता दिसणार होस्टच्या भूमिकेत!

नुकताच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कलर्स मराठीने ऑफिशिअल अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे.

    छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे बिग ब़ॉस. पहिला आणि दुसरा सीझन प्रचंड गाजल्यानंतर आता मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली. त्यानंतर हे पर्व संपत नाही तर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरे विजेता ठरला. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले होते. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    नुकताच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कलर्स मराठीने ऑफिशिअल अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असे कॅप्शन दिले आहे.

    महेश मांजरेकरच करणार सुत्रसंचालन

    अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.