mahesh manjrekar

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Letter About Scene Change) यांनी ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात आल्यााचे पत्राद्वारे कळवले आहे.

    निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे दिग्दर्शन असलेला ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे (Bold Scene) राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. या चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. त्यानंतर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Letter About Scene Change) यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात आल्यााचे पत्राद्वारे कळवले आहे.

    mahesh manjrekar letter

    महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे की,  सर्वांचा आदर व मान राखून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्षे वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. प्रोमोमधून आक्षेपार्ह दृश्ये वगळण्यात आली आहेत.

    तसेच चित्रपटाच्या पार्श्वभूमीबाबतही आपल्या पत्रामध्ये मांजरेकर यांनी सविस्तरपणे लिहिले आहे.