महेश मांजरेकरांची तिसरी लेकही आहे अभिनेत्री, जाणून घ्या गौरी इंगवलेबद्दल!

अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले आहे. तसेच ओवी या नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठीत आपली छाप उमटविली आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले ती सुद्धा अभिनेत्री आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gauri Ingawale (@gauri_ingawale)

  महेश मांजरेकर यांना सई, अश्वामि या २ मुली आहेत तर सत्या नावाचा एक मुलगा. तर गौरी इंगवले ही दत्तक घेतलेली मुलगी आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील ते आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळतात. गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले आहे. तसेच ओवी या नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gauri Ingawale (@gauri_ingawale)

  गौरी लवकरच ‘पांघरुण’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gauri Ingawale (@gauri_ingawale)