malaika arora and salman khan

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सलमान खानच्या कुटुंबातली सदस्य होती. मात्र खान कुटुंबाचा भाग असल्यामुळे नव्हे तर टॅलेंटच्या आधारावर तिला काम मिळालं. तिने स्वत:च फिल्म इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली, असं मलायकाचं म्हणणं आहे. 

  अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मलायकाने पहिलं लग्न अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत केलं होतं. मलायका सलमान खानच्या कुटुंबातली सदस्य होती. मात्र खान कुटुंबाचा भाग असल्यामुळे नव्हे तर टॅलेंटच्या आधारावर तिला काम मिळालं. तिने स्वत:च फिल्म इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली, असं मलायकाचं म्हणणं आहे.

  मलायका आणि अरबाज यांची ओळख एका फोटोशूटच्या वेळी झाली होती.  पहिल्या ओळखीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1991 मध्ये लग्न केलं. दोघांना अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे. अरहान सध्या परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे.

  अरबाज आणि मलायका यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. अरबाज आणि मलायका यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका तुफान चर्चेत आली. एवढंच नाही तर, एक वेळ अशी आली, जेव्हा मलाकाला इंडस्ट्रीमध्ये जे स्थान निर्माण केलंय ते स्वबळावर केलं असल्याचं सांगण्याची वेळ आली.

  ड्रामा क्विन राखी सावंतने (Rakhi Sawant) मलायकावर निशाण साधला होता. अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबातील असल्यामुळे मलायकावर आयटम गर्लचा ठपका लागला नाही, असं राखीने म्हटलं होतं. खान कुटुंबातील असल्यामुळे मलायकाला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळाली असेही राखी म्हणाली होती. राखीच्या आरोपावर मलायकानेही उत्तर दिलं होतं.

  यावर संताप व्यक्त करत मलायका म्हणाली होती की, ‘असं असतं तर मला सलमान खान याच्या प्रत्येक सिनेमात आयटम साँग करायला हवं होतं. मी स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलं आहे. मला सलमान खान याने घडवलेलं नाही.’ असं देखील मलायका म्हणाली.

  मलायकाने आतापर्यंत अनेक सिनेमांत आयटम सॉन्ग करत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दिल से’ सिनेमात ‘छय्या-छय्या’ आणि ‘दबंग’ सिनेमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर आयटम सॉन्ग केला होता. मलायकाच्या या गाण्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. मलायका कायम तिच्या डान्स आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते.