घटस्फोटानंतर जवळपास ४ वर्षांनी अरबाजने मलायका पाठवलं हे गोड गिफ्ट, सोशलमीडियावर फोटो शेअर करत तीनेही मानले आभार!

मलायका आणि अरबाज यांनी १९९८ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०१७ मध्ये ते विभक्त झाले. या दोघांनी एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

    अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे आणि कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. पुन्हा एकदा मलायकाने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पुर्वाश्रमाचा पती अरबाज खानने तिला ते गिफ्ट दिल्याच मलायकाने सांगितले आहे.

    काय आहे व्हिडिओत

    मलायकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आंबे दिसत आहेत. हे आंबे मलायकाला अरबाजने पाठवले आहेत. “आंबे पाठवण्यासाठी धन्यवाद अरबाज” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या व्हिडीओला दिले आहे. आता मलायका आणि अर्जुन हे रिलेशनशिपमध्ये आहेत. यात अरबाजने पाठवलेल्या गिफ्टमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

    मलायका आणि अरबाज यांनी १९९८ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०१७ मध्ये ते विभक्त झाले. या दोघांनी एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघे बराच वेळा एकत्र दिसतात. तर दुसरीकडे अरबाज हा इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.