मलायका अरोराला पती अरबाज खानच्या या कृत्यांचा तिरस्कार

अरहान खानने त्यांच्या वडिलांना आणि काकांना अनेक प्रश्न विचारले आणि यामध्ये त्यांनी गमती गंमतीमध्ये अनेक उत्तरे दिली.

    मलायका अरोरा-अरहान खान : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांच्या नात्यांची बरीच वेळा सोशल मीडियावर चर्चा होत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान त्यांचा स्वतःचा शो दम बिर्याणी घेऊन आला आहे. यामध्ये त्याने पहिल्या भागामध्ये त्याचे वडील अरबाज खान आणि त्याचे काका सोहेल खान यांना आमंत्रित केले होते. यामध्ये तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत बोलताना आणि मजा करताना दिसत आहे.

    अरहान खानने त्यांच्या वडिलांना आणि काकांना अनेक प्रश्न विचारले आणि यामध्ये त्यांनी गमती गंमतीमध्ये अनेक उत्तरे दिली. त्यानंतर अरहान खानने दुसऱ्या भागामध्ये त्याची आई मलायका अरोराला बोलावले होते या भागामध्ये अरहान आणि मलायका एकमेकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. हा एपिसोड खूप पसंत केला जात आहे. अरहानही आईला वडिलांबद्दल अनेक प्रश्न विचारतो. तो मलायकाला विचारतो की तिला अरबाजबद्दल कोणत्या गोष्टी आवडत नाहीत. मलायकाच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरबाज आणि मलायका नेहमीच त्यांचा मुलगा अरहानसाठी एकत्र येतात. अरहान तिच्या आईला तिच्या माजी पतीबद्दल तिला काय आवडते आणि काय आवडत नाही हे विचारतो.

    यावेळी मलायका म्हणाली, ‘तुझे एक्सप्रेशन अगदी त्याच्यासारखे आहेत. फार आकर्षक वागणूक नाही पण ते अगदी त्यांच्या सारखेच आहेत. तुम्ही सुद्धा त्याच्यासारखे खूप अनिर्णित असू शकता, जे मला अजिबात आवडत नाही. तुमच्या शर्टचा रंग किंवा तुम्हाला कोणते अन्न खायचे आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही. मलायकाने पुढे म्हंटले, तो खूप योग्य व्यक्ती आहे जो कधीही गोष्टींचा अतिरेक करत नाही. तो काही गोष्टींबद्दल खूप स्पष्ट आहे आणि तुम्हीही या गोष्टींमध्ये त्याच्यासारखे आहात.