maika arora reaction on milind soman ramp walk

सध्या सोशल मीडियावर(Viral Video On Social Media) मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद सोमण(Milind Soman Ramp Walk After 26 Years) एका कार्यक्रमात रॅम्प वॉक करताना दिसत आहे. ते पाहून मलायका एकदम फिदा झाली आहे.

  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) एक उत्कृष्ट मॉडेल आहे. मलायकाने स्वत:ला ४७ व्या वर्षीही फिट ठेवलं आहे. सध्या सोशल मीडियावर(Viral Video On Social Media) मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद सोमण(Milind Soman Ramp Walk After 26 Years) एका कार्यक्रमात रॅम्प वॉक करताना दिसत आहे. ते पाहून मलायका एकदम फिदा झाली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  मिलिंद सोमणने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मिलिंदने ‘जवळपास २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद शर्टलेस असून त्याने धोतर नेसलं आहे. तो मॉडलिंग करताना दिसत आहे. मिलिंदचा हा लूक मलायका अरोराला प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. तसेच त्याचा रॅम्प वॉक पाहून ‘वाह द लूक’ असे मलायका ओरडताना दिसत आहे.

  मलायका आणि मिलिंद हे दोघेही सध्या ‘मॉडल ऑफ द इअर’ सिझन २ मध्ये एकत्र दिसत आहेत. मिलिंदचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ या शोमधील असल्याचे सांगितले जात आहे.