malaika arora

नुकतंच एका कार्यक्रमाला (Malaika News) मलायकाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मलायका कायम तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. त्यामुळेच 49 व्या वर्षीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना मलायका टक्कर देताना दिसते. नुकतंच एका कार्यक्रमाला (Malaika News) तिने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील मलायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


विरल भयानीने मलायकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका पाठमोरी चालताना दिसत आहे. काळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस तिने घातला आहे. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या लूकसोबत पोनी बांधून मलायकानी हटके हेअरस्टाइल केली आहे. मात्र तिचा हा लूक चाहत्यांना फारसा आवडला नसल्याचं या व्हिडिओवरील कमेंटवरून सिद्ध होत आहे.

मलायकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. “केसाला फॉइल पेपर का लावला आहे?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर एका नेटकऱ्याने “उर्फीची दीदी” म्हणत अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे. “सगळे उर्फीला कॉपी करत आहेत” असंही एकाने म्हटलं आहे. “म्हातारपणात ही उर्फीचा रेकॉर्ड मोडत आहे” असंही एकाने लिहिलं आहे.