मल्याळम फिल्म इंडस्ट्रीली धक्का; अभिनेते विनोद थॉमस यांचं निधन, कारमध्ये आढळले मृतावस्थेत!

धक्कादायक म्हणजे विनोद थॉमस केरळमधील कोट्टायम येथील पंपाडीजवळ एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले.

    मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेते विनोद थॉमस यांचं निधन (Malayalam actor Vinod Thomas ) झालं आहे. वयाच्या अवघ्या 45 वर्षी विनोद थॉमसनं जागाच निरोप घेतला. धक्कादायक म्हणजे विनोद थॉमस केरळमधील कोट्टायम येथील पंपाडीजवळ एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. विनोद यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेविश्वातील तारे आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    हॉटेलमध्ये पार्क केलेल्या कारमध्ये मृतदेह आढळला

    पोलिस सूत्रांनी शनिवारी सांगितले की हॉटेल व्यवस्थापनाने माहिती दिली की त्यांच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये अभिनेते विनोद बराच वेळपासून कारमध्ये बसून होते. पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कारमधून विनोद यांना बाहेर काढुन जवळच्या रुग्णालयात नेलं.  मात्र, डॉक्टरांनी विनोदला तपासून मृत घोषित केलं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

    पोलीस तपास सुरू

    थॉमस यांनी त्याच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केलं.  ‘अयप्पनम कोश्युम’, ‘नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला’, ‘ओरू मुराई वंथ पथया’, ‘हॅपी वेडिंग’ आणि ‘जून’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहते विनोद यांना श्रद्धांजली देत आहेत. चाहत्यांनी पोलिसांनीही या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली जात आहे.