ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर मल्लिका शेरावतने शेअर केला अनुभव, म्हणाली…

मल्लिका शेरावत म्हणते की, ‘ख्वाहिश’ या चित्रपटात १७ किसिंग सीन्स दिले होते. पण ‘नकाब’ या सीरिजमध्ये एका महिला अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन(Mallika Sherawat Intimate Scene) देणं हे फार कठीण होतं.

  बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत(Mallika Sherawat) सध्या ‘नकाब’(Nakaab Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत(Mallika Sherawat Intimate Scene With Esha Gupta) इंटिमेट सीन दिला होता.या सीनविषयी मल्लिकाने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

  मल्लिका म्हणते की, ‘ख्वाहिश’ या चित्रपटात १७ किसिंग सीन्स दिले होते. पण ‘नकाब’ या सीरिजमध्ये एका महिला अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देणं हे फार कठीण होतं. एका महिलेसोबत इंटिमेट होणं खूप कठीण होते. तुलनेने पुरुषासोबत इंटिमेट सीन देणे सोपे असते.

  ख्वाहिश या चित्रपटातून मल्लिकाने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन्स दिले. त्यानंतर तिने ‘मर्डर’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले. यामुळे मल्लिकावर अनेकांनी टीका केली.

  ‘नकाब’ ही वेब सीरिज २६ वर्षांच्या अभिनेत्रीवर आधारित आहे. या अभिनेत्रीच्या आत्महत्येचं कारण पोलीस शोधत असतात. या सीरिजमध्ये मल्लिकाने जोहरा मेहराची भूमिका साकारली आहे.