malvat song success

अजय गोगावलेच्या(New Song Of Ajay Gogawale) आवाजातील ‘मळवट’(Malvat Song) हा ‘सोयरीक’(Soyrik Movie) या आगामी मराठी चित्रपटातील गोंधळ(Marathi Gondhal Song) रसिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

    नवरात्रीच्या मुहूर्तावर आलेला अजय गोगावलेच्या(New Song Of Ajay Gogawale) आवाजातील ‘मळवट’(Malvat Song) हा ‘सोयरीक’(Soyrik Movie) या आगामी मराठी चित्रपटातील गोंधळ(Marathi Gondhal Song) रसिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अदिती म्युझिक कंपनीच्या वतीनं प्रदर्शित झालेल्या ‘मळवट’ च्या गोंधळ प्रकारातील गाण्याने अल्पावधीतच १५ लाख व्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे.

    यल्लमा देवीचा जागर या गाण्यातून करण्यात आला आहे. हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून, संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. या गोंधळाला मिळालेल्या यशाबद्दल अदिती म्युझिकचे सर्वेसर्वा विजय शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

    या यशाचा आनंद ‘सोयरीक’ चित्रपटाच्या टीमनं केक कापून साजरा केला. मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नाईंटीनाईन प्रोडक्शन्स आणि बहुरूपी प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या कौटुंबिक धाटणीच्या या मनोरंजक चित्रपटात बरेच नामवंत कलाकार झळकणार आहेत.