manasi naik and pradeep kharera divorce

मानसी नाईकनं (Manasi Naik Divorce) आता एका मुलाखतीमध्ये आपल्या घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे.

  मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) घटस्फोट घेणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. मानसी नाईकनं आता एका मुलाखतीमध्ये आपल्या घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत मानसीनं सांगितलं, “ हो तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे. मी याबाबत खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे सध्या मी खूप भावूक झाले आहे.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

  पुढे ती म्हणाली, “नक्की काय चुकलं हे मी सांगू शकत नाही. पण हे सर्व खूप लवकर घडले. माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे, मला पुन्हा प्रेम करायचे आहे. एक काळ असा होता की मला कुटुंब हवे असल्यानं मी लग्न केलं. अर्थात ते खूप लवकर घडलं त्यामुळे मला वाटतं की सगळं चुकतं गेलं. माझ्यासाठी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मला त्यांच्या (प्रदीप खरेरा) कुटुंबाबद्दल आणि त्यांच्याबद्दल खरोखर आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला स्वाभिमान आहे. मी माझ्या करिअरवल लक्ष केंद्रित करणार आहे.”

  मानसीनं प्रदीपला सोशल मीडियावर अनफॉलो केलं तसेच तिनं प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे ते दोघे विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसीने काही फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “मी अशा कुटुंबामध्ये वाढले आहे, जिथे स्त्रियांनी पुरुषासोबत किंवा त्याच्याशिवाय सर्वकाही करून दाखवले आहे”. तिने पुढे म्हटले आहे की आता गमावण्यासारखं काही नाही. तिने या पोस्टमध्ये अवघ्या विश्वाचे आभार मानले.

  मानसी आणि प्रदीपनं १९ जानेवारी २०२१ रोजी लग्न केलं. प्रदीप आणि मानसीच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मानसीच्या करिअरबद्दल सांगायचं तर तिचा ‘एकदम कडक’ हा चित्रपट २ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.