‘झलक दिखला जा 11’ची विजेती घोषीत! बिहारच्या मनीषा रानीनं जिकंली ट्रॉफी

'झलक दिखला जा 11' कार्यक्रमाचा अंतिम सोहळा काल पार पडला. बिहारच्या मनीषा रानीनं ट्रॅाफीवर आपलं नाव कोरलं.

    टेलिव्हीजन वरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 11’ (Jhalak Dikhla Jaa 11) प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. नुकताचं या कार्यक्रमाचा अंतिम सोहळ पार पडला. या अंतिम सोहळ्यात बिहारची मनीषा रानी (Manisha Rani) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. मनीषा रानीने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत ‘झलक दिखला जा 11’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

    मनीषा रानी ठरली विजेती

    ‘झलक दिखला जा 11’ चं विजेतेपद पटकावल्यानंतर मनीषाला तिला ट्रॉफीसह 30 लाख रुपये मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये मनीषा रानी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीराम चंद्रा आणि धनश्री वर्मा या स्पर्धकांचा समावेश होता.

    चाहत्यांनीच मला जिंकवलं  – मनीषा रानी

    ‘झलक दिखला जा 11’चं विजेतेपद पटकावल्यानंतर मनीषा रानीनं आंनद व्यक्त केला असून चाहत्यांचे आभार मानले आहे. मनीषा म्हणाली की,”माझा माझ्या वडिलांपेक्षा चाहत्यांवर जास्त विश्वास आहे. चाहत्यांनीच मला जिंकवलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार चाहत्यांचा आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार”.