मनोज बाजपेयी, विनोद भानुशाली घेऊन येणार कोर्टरूम ड्रामा, शूटिंग सेटवरचे फोटो आलेत समोर

अभिनेता मनोज बाजपेयी, विनोद भानुशाली आणि अपूर्व सिंग कार्की यांच्या कोर्टरूम ड्रामाचे फोटो झाले इंटरनेटवर व्हायरल

    मुंबई : तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee ) यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलं नसंल तरी हा एक कोर्टरूम ड्रामा असल्याचं कळतयं. त्यांच्या चित्रपटाची शुटींग सुरू झाली असून मुंबईतील शुटींग सेटवरचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

    विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, सुपर्ण एस वर्मा आणि झी स्टुडिओजद्वारा समर्थित असलेल्या या कोर्टरूम ड्रामाच्या सेटवरील चित्रे इंटरनेटवर व्हायरल होऊ लागली आहेत. या कोर्टरूम ड्रामाचे चित्रीकरण गेल्या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरू झाले असून, मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगच्या काही झलक आता समोर येऊ लागल्या आहेत. ही छायाचित्रे मुंबईच्या शेड्यूलमधील आहेत, ज्यामध्ये कोर्ट रूमचे काही इंटेन्स सीन्स शूट केले जाणार आहेत. तसेच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या शेड्युलचे चित्रीकरण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

    अलीकडेच,  टीमने जोधपूरमध्ये शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. मनोज बाजपेयी यांनी या दौऱ्यादरम्यान शहरातील आदरातिथ्य अनुभवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच, २०२३मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा निर्माते करत आहेत. या हार्ड हिटिंग कथेसह दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांचे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण होत आहे, ज्यांनी अनेक एस्पिरेंट्स, सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड, आणि फ्लेम्स यांसारखे लोकप्रिय ओटीटी शो तयार केले आहेत. सुपर्ण एस वर्मा आणि मनोज बाजपेयी हे पुरस्कार विजेती मालिका ‘द फॅमिली मॅन’नंतर एकत्र येत आहेत. तसेच, या चित्रपटात उत्कृष्ट कलाकारांचाही समावेश आहे. झी स्टुडिओ आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेडद्वारे प्रस्तुत, सुपर्ण एस वर्माचा कोर्टरूम ड्रामा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित, आणि विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानीद्वारा निर्मित आहे.