shashank ketkar

अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली. शशांकने आपल्या बायकोबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला शशांकने एक छानस कॅप्शनही दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

“सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा”, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar) 

शशांकने ही गुड न्यूज शेअर करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच येत्या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. यात अभिनेत्री धनश्री काडगांवकर, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा यांच्याही घरी नव्या सदस्यांचं आगमन होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)