pooja sawant

सेलेब्रेटींनी एखादा फोटो शेअर केल्यावर त्या फोटोचं कौतुक करण्याबरोबरच अनेकदा ट्रोलही केलं जातं. पण नेटकरी कोणत्या फोटोला ट्रोल करतील हे काही सांगू शकत नाही. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री पूजा सावंत हिच्याबाबत घडला. पण या ट्रोलिंगवर पूजाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

काही दिवसांपूर्वी पूजाने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंचं अनेक चाहत्यांनी कौतुक केलं. तिने परिधान केलेल्या कपड्यांवर एकाने नाराजी व्यक्त केलीये. या कमेंट करणाऱ्याला पूजाला सडेतोड उत्तर दिलय. पूजा म्हणाली, ‘आम्ही काय आणि कसे कपडे घालायचे हे आम्हाला कुणी सांगू नये. मुळात कपडे घालताना आम्हालाही तारतम्य असतं’. तिच्या या प्रत्युत्तराचं कौतुक होतंय.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

कलाकार नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यांना काही बोललं तरी चालतं असा एक समज सोशल मीडियातल्या जगात रुढ होतो आहे. पण, पूजाने चोख उत्तर देऊन तो समज मोडीत काढला आहे. बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणेच आता मराठी सेलेब्रेटींनाही ट्रोल करण्याचा प्रकार वाढत चालला आहे.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)