सई ताम्हणकरला IMDB च्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and webseries 2021 ची लिस्ट जाहीर केली. ह्या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख करून तिचा गौरव केला आहे.

  मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करताना दिसते. सईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. सईला IMDB च्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.

  Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and webseries 2021 ची लिस्ट जाहीर केली. ह्या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख करून तिचा गौरव केला आहे.

  सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. IMDB ने ह्याची दखल घेत सईला ‘breakout star’ म्हटले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

  ह्या सन्मानाविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते,” आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोन ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबी सारख्या प्रतिथयश प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही आनंदाचीच गोष्ट आहे.”