२६ व्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलच्या मध्ये मराठी माहितीपट अबाऊट लव्ह समाविष्ट

युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल व्हर्चुअल स्वरुपात १ नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. दर्जेदार पुरस्कार-विजेते युरोपियन सिनेमाचा आनंद रसिकांना घरबसल्या घेता येईल आणि त्याद्वारे पाश्चात्य युरोपियन संस्कृतीचे कंगोरे समजून घेता येईल.

  मुंबई : युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये संपूर्ण युरोप आणि भारतातील ३७ भाषांमधील ६० चित्रपट दाखवले जातील. यातच अबाऊट लव्हचा समावेश करण्यात आला आहे.

  हा महोत्सव १ नोव्हेंबरपासून सुरूहोईल. यात सहभागी होण्यासाठीरसीक फेस्टिव्हल स्कोप आणि युरोपियन युनियनफिल्म फेस्टिव्हल वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकतात.

  युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल व्हर्चुअल स्वरुपात १ नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. दर्जेदार पुरस्कार-विजेते युरोपियन सिनेमाचा आनंद रसिकांना घरबसल्या घेता येईल आणि त्याद्वारे पाश्चात्य युरोपियन संस्कृतीचे कंगोरे समजून घेता येईल.

  या महोत्सवात अर्चना अतुल फडके दिग्दर्शित ‘अबाऊट लव्ह’हा मराठीमाहितीपट दाखवण्यात येणार आहे. युनायटेड किंगडममधीलशेफीडच्या महोत्सवात या माहितीपटाला शेफील्डडॉक फेस्ट २०१९ मध्ये सर्वोत्कृष्टचित्रपट (न्यू टॅलेंट अवॉर्ड), जर्मनीतील स्टेटगार्ट इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट आणि सर्वोत्कृष्ट आशियाईमाहितीपट म्हणून पुरस्कार मिळवलेत.

  अबाउटलव्ह ह्या चित्रपटाची कथा ही मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या १०२ वर्षे जुन्या फडके बिल्डिंगच्या भोवती फिरते ज्यात फडके कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र राहतात.

  महिनाभर चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ८ शैलींमधील ३७ भाषांमधील ६० चित्रपटांचा खजिना रसिकांना अनुभवता येणार आहे. २७सदस्य राज्ये आणि सहयोगी देशांमधील कलात्मक उत्कृष्ठ कथांचा कलाविष्कार या निमित्ताने प्रेक्षकांना पाहाता येईल. कान्स, लोकार्नो, सॅन सेबॅस्टियन, कार्लोवीवेरी आणि व्हेनिस नंतरआता हा महोत्सव साजरा होतोय.

  या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या समकालीन भारतीय विभागात हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली याचार भारतीय अधिकृत भाषांमधील सहा चित्रपटांचा समावेशआहे.

  फिल्म फेस्टिव्हल आणि संबंधित महोत्सवाची तिकिटे प्रेक्षकांसाठी मोफत असतील. प्रेक्षकप्रतिनिधी मंडळाच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे नोंदणी करू शकतात. हा चित्रपट महोत्सव ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर, दर्शक त्यांच्या सोयीनुसार लॉग इन करू शकतात.

  नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

  युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल वर अधिक माहितीसाठी भेट द्या.

  युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हलचा युट्युब ट्रेलर पहाण्यासाठी येथे क्लिक करा.