बॉलिवूड कलाकरांच्या पंक्तीत आलं मराठी जोडपं, मुंबईत खरेदी केले १७.५ कोटींचे दोन आलिशान फ्लॅट्स!

मराठी चित्रपट सृष्टीमधील निर्माते श्रीकांत देसाई आणि त्यांची पत्नी मुग्धा देसाई यांनी दर्शन देसाईंच्या सोबत या महागड्या घरांची खरेदी केलीय.

    मुंबईमधील महागड्या भागांमध्ये अनेक कलाकारांनी कोट्यावधी रुपयांची घरं घेतल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील एका जोडप्याने नुकतच वांद्र्यामध्ये कोट्यावधींचं घरं घेतली आहे. या जोडप्याने दोन घरं घेतली असून त्यांची एकत्रित किंमत साडे सतरा कोटी रुपये इतकी आहे.

    मराठी चित्रपट सृष्टीमधील निर्माते श्रीकांत देसाई आणि त्यांची पत्नी मुग्धा देसाई यांनी दर्शन देसाईंच्या सोबत या महागड्या घरांची खरेदी केलीय. दर्शन प्रोडक्शन नावाचं प्रोडक्शन हाऊस असणाऱ्या देसाईंनी आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय. हे दोन्ही फ्लॅट्स व्हाइट रोज नावाच्या इमारतीमध्ये असून ही इमारत वांद्रे पश्चिम येथील पेरी रोडवर आहे.

    हे फ्लॅट्स इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आहेत. यापैकी फ्लॅट क्रमांक १७०१ ची किंमत ८ कोटी ८८ लाख ६७  हजार ५०० इतकी आहे तर त्याच्या बाजूच्या १७०२ साठीही इतकीच किंमत मोजण्यात आलीय. दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित किंमत १७.५ कोटी इतकीय.

    देसाईंनी घेतलेल्या या फ्लॅट्सचा व्यवहार करताना ५३ लाख ३२ हजारांची स्टॅम्प ड्युटीची रक्कम देण्यात आली आहे. राज्य सरकारने जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान स्टॅम्प ड्युटीवर दोन टक्क्यांची सवलत दिली होती. तीन मार्च २०२१ आधी स्टॅम्प ड्युटी भरल्यास नंतर विक्रीचा कररानामा करण्याची सवलत देण्यात आली होती.