devmanus

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ह्या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील "सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव "

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथानकामुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणित मालिकेत उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंकाच नाही. तेव्हा पाहायला विसरू नका ‘देवमाणूस’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.