लग्नाच्या वर्षभरात मसाबा गुप्ताच्या घरी हलणार पाळणा, नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज!

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने 18 एप्रिल रोजी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

  या वर्षी मनोरंजन सृष्टीतल्या अनेक कलाकारांनी चाहत्यांना गोड बातमी दिली. यामध्ये अभिनेत्री दिपीका पादुकोण, अभिनेता वरुण धवन यांचा समावेश आहे. यामध्ये आता फॅशन डिसायनर मसाबा गुप्ताचंही (Masaba Gupta Pregnancy) नाव जोडलं गेलं आहे. वर्षभरापुर्वी अभिनेता  सत्यदीप मिश्रासोबत लग्न केल्यानंतर आता ती आई होणार आहे. मसाबाने तिच्या नवऱ्यासोबत बेबी बंब दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या आनंदाच्या बातमीनंतर तिची आई अभिनेत्री निना गुप्ता (Neena Gupta) यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यांनीही सोशल मीडीयावर फोटो शेअर करत आज्जी होणार असल्याचं चाहत्यांना सांगतिलं आहे.

  [read_also content=”मणीपूरमध्ये निवडणुकीतही शांतता नाहीच! मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू~https://www.navarashtra.com/india/four-people-died-in-firing-at-manipur-polling-booth-nrps-525352/”

  वयाच्या 34 व्या वर्षी मसाबा ही आई होणार आहे. तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच  फॅन्ससह सेलेब्रिटिही तिचं अभिनंदन करताना दिसत आहे. मसाबाने 2015 मध्ये निर्माता मधु मंटेनासोबत लग्नगाठ बांधली होती. पण तीनच वर्षात त्यांचं हे नातं तुटलं. त्यांनी 2018 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मसाबाने मागील वर्षी म्हणजेच 27 जानेवारी 2023 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं. सत्यदीप मिश्रा हा अदिती राव हैदरचा एक्स नवरा आहे. 2013 मध्ये अदिती आणि त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

  नीना गुप्ता यांची पोस्ट चर्चेत

  नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी लग्न केले नाही आणि 1989 मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव मसाबा आहे. विवियन आधीच विवाहित असल्याने नीना सिंगल मदर झाली आणि मसाबाला वाढवले. 2008 मध्ये नीनाने अमेरिकेतील दिल्लीस्थित सीए विवेक मेहरासोबत लग्न केले. आजी झाल्याचा आनंद व्यक्त करताना नीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या मुलांच्या मुलाचे आगमन होणार आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Neena Gupta (@neena_gupta)