बिग बॉसच्या 16व्या सीझनचा एमसी स्टॅन विजेता; तर मराठमोळा शिव ठाकरे उपविजेता, विजेत्याला मिळाली ‘एवढी’ रक्कम, वाचा…

एमसी स्टॅनला सर्वाधिक मते मिळाली. शोचा फिनाले जवळपास 5 तास चालला. प्रियांका बिग बॉस 16 चे विजेतेपद जिंकू शकली नसली तरी सलमानने सांगितले की, तीच त्याच्यासाठी खरी विजेती आहे. तर शिव ठाकरे (Shiv Thackeray) उपविजेता ठरला.

  मुंबई: रॅपर एमसी स्टॅनने (MC Satan) रविवारी रात्री बिग बॉस (Bigg Boss) 16 चे विजेतेपद (winner) पटकावले तर शिव ठाकरे (Shiv Thackeray) उपविजेता ठरला. प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे टॉप 3 फायनलमध्ये पोहोचले होते. प्रियंका शेवटी बाहेर पडली. एमसी स्टॅनला सर्वाधिक मते मिळाली. शोचा फिनाले जवळपास 5 तास चालला. प्रियांका बिग बॉस 16 चे विजेतेपद जिंकू शकली नसली तरी सलमानने सांगितले की, तीच त्याच्यासाठी खरी विजेती आहे. तर शिव ठाकरे (Shiv Thackeray) उपविजेता ठरला.

  विजेत्यासा काय मिळाले?

  बिग बॉसच्या 16व्या सीजनचा एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका चहर चौधरी यांना मागे टाकत स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. स्टॅनचा विजय प्रेक्षकांसाठी अनपेक्षित होता. हा हंगाम 4 महिने चालला. बक्षीस म्हणून रॅपरला 31 लाख रुपये आणि एक आलिशान कार मिळाली. याआधी स्टॅन एमटीव्हीचा विजेता ठरला आहे.

  प्रियंकाची घसघशीत कमाई…

  जरी स्टॅन विजेता ठरला, त्याला 31 लाख रुपये आणि एक लक्झरी कार बक्षिस म्हणून मिळाली आहे. स्टॅनने पुरस्काराची मोठी रक्कम जिंकली असली तरी प्रियंकानेही त्याच्याखालोखाल कमाई केली आहे. त्यामुळे ती पराभूत होऊनही फायद्यातच राहिली आहे. प्रियंकाला 25 लाख आणि अॅड तर मिळालीच आहे. शिवाय तिला एका सिनेमात काम करण्याची संधीही मिळाली आहे. तिला डंकी या सिनेमात काम मिळालं आहे.

  शालीन आणि अर्चना अंतिम फेरीत बाहेर पडले
  शालीन भनोत आणि अर्चना गौतम हे दोघे शोच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये होते. पण अंतिम फेरीत शालीन आणि अर्चना बाहेर पडले. अशा परिस्थितीत प्रियांकाची उपस्थिती असूनही एमसी स्टॅन आणि शिव हे ट्रॉफीसाठी प्रबळ स्पर्धक होते, अशी अटकळ बांधली जात होती. बिग बॉस 16चे ग्रँड फिनाले काल संध्याकाळी 7 वाजता सुरू झालं. यावेळी बिग बॉसचे सर्व स्पर्धक स्टेजवर हजर होते. पहिल्या टॉप स्पर्धकांपैकी सर्वात आधी शालीन भनोट स्पर्धेतून बाहरे पडली. त्यानंतर अर्चा गौतम बाहेर पडली. शालीन शोमधून बाहेर पडल्याने ती निराश होती.