ajunhi barsat ahe

डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे(Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. बऱ्याच वर्षांनी अचानक भेटलेले (Ajunhi Barsat Ahe) दोघं आणि मग त्यांची पुन्हा सुरू झालेली प्रेमकहाणी आता लग्नाचं(Meera And Adiraj Marriage) रूप घेणार आहे.

    सोनी मराठी (Sony Marathi)वाहिनीवरील ‘अजुनही बरसात आहे’(Ajunhi Barsat Ahe) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. डॉ. मीरा आणि डॉ. आदिराज अर्थातच मुक्ता बर्वे(Mukta Barve) आणि उमेश कामत (Umesh Kamat) या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. बऱ्याच वर्षांनी अचानक भेटलेले दोघं आणि मग त्यांची पुन्हा सुरू झालेली प्रेमकहाणी आता लग्नाचं(Meera And Adiraj Marriage) रूप घेणार आहे.


    कॉलेजमध्ये असताना मीरा आणि आदिराज यांची भेट एका प्रसंगात अचानक होते. भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि कालांतरानं प्रेमात होतं, पण काही कारणानं त्यांचं ब्रेकअप होतं. १० वर्षांनंतर ते पुन्हा भेटतात. जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मनातलं प्रेम ओठांवर येतं. आदिराज आणि मीरा आता एकमेकांचे होणार आहेत. मीरा आणि आदिराज यांचं लग्न लवकरच पार पडणार आहे.

    अनेक संकटं, दुरावा, भांडणं या सगळ्यावर मात करून हा विवाह सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सोनी मराठी वाहिनीवर संपन्न होणार आहे. २४ नोव्हेंबरपासून हॅशटॅग आदिरा यांचा विवाहसप्ताह सुरू होणार असून, प्रेक्षकांना मीरा आणि आदिराज यांच्या लग्नसमारंभातले क्षण, अर्थातच मेहंदी, संगीत, हळद हे सगळं अनुभवता येणार आहे. २४ ते ३० नोव्हेंबर मीरा आणि आदिराज यांचा विवाह सप्ताह पाहायला मिळणार आहे.