मीराच्या मागं मागं करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठंतरी मागं पडत आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहाविषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली की, स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुपमध्ये कीडे करत आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाहीये.
बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलत असतात. कधी मैत्री होते, तर कधी त्याच व्यक्तीशी भांडण देखील(Dispute In Bigg Boss Marathi 3) होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावं लागतं. जोड्या दर आठवड्यात बदलतानाही दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा(Meera) आणि गायत्री(Gayantri). यामुळं गायत्रीला महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांनी सुनावलंही.
मीराच्या मागं मागं करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठंतरी मागं पडत आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहाविषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली की, स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुपमध्ये कीडे करत आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाहीये.
गायत्री म्हणाली की, स्नेहा मानत नाही तिनं असं काही केलं. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली की, मी काय करू ? मी तिला म्हणाले माझं तुला सांगणं आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं रहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखाताईंनाही तसंच वाटलं होतं, आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोलली असतं असं काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली असती तर ठीक होतं. मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहानं तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातून दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा इतका आवाज ऐकला.