megha in london cafe

मेघा शेट्टी (Megha Shetty First Marathi Film) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. निर्माते दिपक राणे (Deepak Rane) यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी सिनेमात लाँच केले आहे.

  ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ (After Operation London Cafe) सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. निर्माते दिपक राणे (Deepak Rane) यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी सिनेमात लाँच केले आहे. मेघा शेट्टी (Megha Shetty First Marathi Film) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची ‘जोथे जोलाई’ ही मालिका चांगलीच गाजली होती. ‘ट्रायबल रायडींग’ आणि ‘दिलपसंद’ या सिनेमातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepak Rane Films (@deepakranefilms)

  दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्री यांची निर्मिती असलेला ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ रोमँटिक -ॲक्शनपट आहे. या सिनेमात कन्नड स्टार कवीश शेट्टी मुख्य भूमिकेत आहे आणि त्याचं पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या सिनेमातील नायिका मेघा शेट्टी हिचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मेघाच्या वाढदिवसानिमित्त तिचा या सिनेमातील लूक समोर आला आहे. मेघाचा लूक हा शांत, साधा, सालस असा आहे.

  दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीनी एकत्रित येऊन केलेला हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी या सोबत मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.सदागरा राघवेंद्र यांनी हा सिनेमा दिग्दर्शीत केला आहे. तर दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मिती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.