मिस युनिव्हर्सपेक्षा मिस नेपाळची चर्चा जास्त! या सुंदरीने स्विमसूट राऊंडमध्ये असं काही केलं की इंटरनेट लावलं वेड

मिस युनिव्हर्स 2023 च्या स्विमसूट स्पर्धेसाठी मिस नेपाळ ज्या आत्मविश्वासाने रॅम्पवर आली तेव्हा तिचा रॅम्पवॅाक पाहून लोकांनी तिचं कौतुक केलं सध्या तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

  मिस युनिव्हर्स (miss universe 2023) ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावशाली सौंदर्य स्पर्धांपैकी एक मानली आहे. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील सौंदर्यवती सहभागी होतात. मिस युनिव्हर्स हे एक माध्यम आहे जे महिला सक्षमीकरणाच्या कल्पनेला पूर्ण समर्थन आणि पुढे नेण्यासाठी पाहिले गेले आहे. मात्र, अनेकदा सामान्य शरीराच्या प्रकाराचा प्रचार केल्याचा आरोपही या स्पर्धेवर करण्यात आला. परंतु यावेळी या स्पर्धेत असं काही घडलं ज्याची इंटरेनटवर चांगलीच चर्चा होत आहे. मिस नेपाळ जेन गॅरेट (Miss Nepal jane garret) या सौंदर्यवतीने शरीराबद्दलच्या ठराविक निकषांच्या अगदी विरुद्ध जात स्विमसूट फेरीत असं काही केलं की लोकं तिचं कौतुक करताना दिसत आहे.

  मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या स्विमसूट फेरीत जेन गॅरेटने (miss nepal jane garret takes) रुबिन सिंगरने डिझाइन केलेला स्विमसूट परिधान केला होता. चमकदार फिनिशमध्ये स्ट्रेचेबल फॅब्रिकपासून बनवलेल्या, वन-पीसमध्ये प्लंगिंग नेकलाइन आणि मागील बाजूस कट-आउट डिझाइन होते. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. जेनने हा बोल्ड कट स्विमसूट अतिशय परिधान केला आणि आत्मविश्वासाने तो  ती रॅम्पवर चालली.

  रॅम्पवॅाकनं सगळ्यांना लावलं वेड

  ‘मिस युनिव्हर्स’च्या प्राथमिक स्पर्धेच्या फेरीत, जीथे सगळ्या सडपातळ बांधाच्या मुली पाहायला मिळतात तिथे जेन सुडौल शरीराच्या या तरुणीने आत्मविश्वाने रॅम्प वॉक केला. तिचा रॅम्पवॅाक पाहताना तिला पाहणाऱ्या प्रत्येकाला तिच्या सौंदर्याचं तर वेड लागलंच पण जेनने शरीराबद्दल सकारात्मक राहण्याचा जो संदेश दिला तो त्याचे लोकं चाहते झालेत.

  नेटकऱ्यांनी केलं कौतुक

  जेनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोकांनी जेनचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या. कोणी लिहिलं की ‘खरी आकाराच्या सौंदर्याची ही खरी व्याख्या आहे…’, तर कोणी लिहिलं ‘सौंदर्य, शक्ती, आत्मविश्वास, संदेश…याचा संगम…

  गॅरेटचा प्लस साईझ लुक

  जेन एक बिझनेसवुमन आणि नर्स देखील आहे. आत्मविश्वासाने वावरणाऱ्या गॅरेटची फिगर खराब सवयींमुळे नाही तर हार्मोनल समस्यांमुळे वाढली. यामुळेच मानसिक आरोग्य आणि PCOS बद्दल महिलांना  जागरुक करणं हे तिचं उद्दिष्ट असल्याचं सांगते.