७३ वर्षीय मिथुन चक्रवर्तींंच्या हेल्थ बाबत मोठी अपडेट, ब्रेन स्ट्रोक आल्याने सुरू होते उपचार; प्रकृती स्थिर!

शनिवारी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या हेल्थबद्दल अपडेट समोर येत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty)  यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकाता येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर  डॉक्टरांची टीम त्याच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहे.

  10 फेब्रुवारीला सकाळी मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली होती. त्यांच्यावर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथुनच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असं सांगण्यात आलं होतं. आता रुग्णालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये मिथुन रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

  काय म्हणाले डॉक्टर

  अभिनेते मिथुन यांना सकाळी ९.४० वाजता खासगी रुग्णालयात आणण्यात आले. छातीत दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मिथुनच्या मेंदूवर एमआरआय, रेडिओलॉजी आणि अनेक प्रयोगशाळा चाचण्या झाल्या. त्यांच्या मेंदूशी संबंधित इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाला आहे. आता ते पूर्णपणे शुद्धीत आहे आणि बरे आहे. डॉक्टरांनी त्याला सॉफ्ट डाएटवर ठेवले आहे. न्यूरोफिजिशियन त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. तो अनेक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याशिवाय हृदय व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टही त्यांची तपासणी करत आहेत.

  मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाले होते की, हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे. मला खूप बरे वाटत आहे.

  त्यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये मिथुन सुमन घोषच्या सुपरहिट बंगाली चित्रपट काबुलीवाला मध्ये दिसले होते. 2022 मध्ये, त्याने विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त IAS ची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ही मिळाला होता.