प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगची आत्महत्या, IPL क्रिकेटर चौकशीच्या फेऱ्यात, शेवटच्या फोन कॅालनं उघड होणार सत्य!

तानिया आणि अभिषेक काही काळापासून संपर्कात नव्हते, पण अभिषेक त्यांचा मित्र असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, असेही तपासात समोर आले आहे.

  फॅशन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगने आत्महत्या (Model Tania Singh suicide) केली आहे. अवघ्या 28 वर्षी तानियाने आयुष्य संपवल्याने धक्का बसला आहे.  तिच्या आत्महत्येच नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र, तिच्या फोन मध्ये असलेल्या लास्ट कॅालने पोलिसांच लक्ष वेधलं आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणारी खेळाडू अभिषेक शर्मा याचा लास्ट कॅाल तिच्या फोनवर आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिषेक आता पोलिसांच्या तपासाच्या रडारवर आली आहे.

  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा खेळाडू अभिषेक शर्मा (अभिषेक शर्मा आयपीएल क्रिकेटर) वादात सापडला आहे. सुरतमधील प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगच्या आत्महत्येनंतर स्थानिक पोलिसांनी तिच्या चौकशी करत आहेत. कारण पोलीस तपासात समोर आले आहे की, मॉडेल तानियाने 23 वर्षांच्या अभिषेकला शेवटचा कॉल केला होता. अशा परिस्थितीत पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या अष्टपैलू खेळाडूला चौकशीसाठी बोलावले आहे. या खेळाडूला हैदराबादने 6.5 कोटी रुपयांना खरेदी केले.

  मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती तानिया

  28 वर्षांची तानिया फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. इंस्टाग्रामवर त्याचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये ती डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचे लिहिले आहे.

  तानिया आणि अभिषेक काही काळापासून संपर्कात नव्हते, पण अभिषेक त्यांचा मित्र असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती समोर आलृी आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Sharma (@abhisheksharma_4)