चोरी दरम्यान प्रोफेसर पुन्हा गायब, पाहा मनी हायस्ट सीझन 5 पार्ट 2 चा फर्स्ट लुक

नेटफ्लिक्सने या सिरीज संबंधित 2 मिनिटांचा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चोरी दरम्यान प्रोफेसर गायब होतात आणि ही चोरी पुन्हा थांबते. टीमचे सर्व सदस्य यावेळी सभागृहात उभे राहून विचार करत आहेत की आपण कसे पळून जाऊ आणि या टकसाळातून सोने बाहेर काढू. सध्या 90 टन सोने प्राध्यापकांच्या टीमकडे पडून आहे. जे त्यांना बाहेर काढावे लागेल.

    मनी हायस्ट सीझन 5 हाफ सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यानंतर, आता प्रेक्षक त्याच्या उर्वरित भागांची वाट पाहत आहेत. या मालिकेत यावेळी सर्व सदस्य त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि सोनाला बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

    बँक ऑफ स्पेनच्या आत एका प्रचंड स्फोटानंतर सर्व सैन्य अधिकारी मारले गेले आहेत आणि प्राध्यापकांच्या टीमने त्यांची खास साथिदार टोक्यो देखील गमावली आहे. नेटफ्लिक्सने शनिवारी या मालिकेशी संबंधित एक खास व्हिडीओ प्रसिध्द केला आहे. ज्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

    नेटफ्लिक्सने या सिरीज संबंधित 2 मिनिटांचा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, चोरी दरम्यान प्रोफेसर गायब होतात आणि ही चोरी पुन्हा थांबते. टीमचे सर्व सदस्य यावेळी सभागृहात उभे राहून विचार करत आहेत की आपण कसे पळून जाऊ आणि या टकसाळातून सोने बाहेर काढू. सध्या 90 टन सोने प्राध्यापकांच्या टीमकडे पडून आहे. जे त्यांना बाहेर काढावे लागेल.

    दरम्यान, संघातील पलेर्मो चिडला आणि त्याने रिओच्या कानपट्टीवर बंदूक रोखली. डेन्व्हर म्हणतो की आपण ही होस्टेज जनरल तमायोला देऊ आणि त्याला आम्हाला जाऊ देण्यास सांगू. त्याचवेळी सर्वांना शंका येती की, पोलिसांची टीम अजूनही मिंटमध्ये असण्याची श्यक्यता आहे. आणि पोलिस त्याचं बोलणं ऐकत असूशकतात. हे सर्व ऐकल्यानंतर मनिला म्हणते की “हा जगातील सर्वात बकवास चोरीचा प्लान आहे.”

    मनी हायस्ट सीझन 5 चा भाग 2 डिसेंबर 3 ला रिलीज होणार आहे. ज्याची चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. मनी हायस्ट सीझन 5 हा देखील जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा शो बनला आहे. यामुळे आता प्रेक्षकांना ते पूर्ण पाहायचा आहे.