250 पेक्षा जास्त तरुणींवर बलात्कार, अल्पवयीन मुलींनाही सोडलं नाही, हादरवून टाकणारा ‘अजमेर 92’ सिनेमाचा ट्रेलर

बहुचर्चित आणि रीलिजपूर्वीच वादात सापडलेल्या 'अजमेर 92' (Ajmer 92) या सिनेमाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्ट झालेली आहे. 1992 साली 250 हून जास्त मुस्लीम नसलेल्या मुलींवर बलात्काराची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. या सगळ्या मुलींना ब्लॅकमेल करण्यात आलं आणि अनेक वर्ष त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.

  मुंबई : बहुचर्चित आणि रीलिजपूर्वीच वादात सापडलेल्या ‘अजमेर 92’ (Ajmer 92) या सिनेमाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्ट झालेली आहे. 1992 साली 250 हून जास्त मुस्लीम नसलेल्या मुलींवर बलात्काराची कहाणी (Rape Story) या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. या सगळ्या मुलींना ब्लॅकमेल करण्यात आलं आणि अनेक वर्ष त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.

  यातल्या अनेक मुली अल्पवयीन होत्या. हे सगळं कांड त्या काळात करणाऱ्यांचे प्रमुख फारुख आणि नफीस चिस्ती करत असल्याचं सांगण्यात येतंय. हे दोघंही प्रतिष्ठित असलेल्या अजमेर दर्ग्याच्या व्यवस्थापन सांभाळणाऱ्या खादीम परिवाराशी संबंधित आहेत. ही टोळी बंगल्यांवर किंवा फार्म हाऊसवर या मुलींवर सामूहिक बलात्कार करत असल्याची चर्चा आहे. या मुलींचे नको त्या अवस्थेतील फोटो काढण्यात येत असत आणि त्यांना समाजात दाखवू असं सांगत त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असे.

  ट्रेलरमध्ये नेमकं काय दाखवलंय?

  या सिनेमाचा ट्रेलर वादात सापडण्याची शक्यता आहे. ट्रोलरमध्ये मुलींवर झालेल्या एकापाठोपाठ बलात्कार, त्यांना करण्यात आलेलं ब्लॅकमेलिंग तसचं काही मुलींनी केलेल्या आत्महत्या, याची एक झलक दाखवण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन आणि राजकारण्यांनीही हे प्रकरण दाबण्याचा कसा प्रयत्न केला याची चुणूकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

  21 जुलैला रीलिज होणार अजमेर 92

  या सिनेमाचं दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. तर सूरज पाल रजक, ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि पुष्पेंद्र सिंह या तिघांनी मिळून सिनेमाची कथा लिहिलेली आहे. सिनेमात मनोज जोशा, सयाजी शिंदे यांच्यासारख्या अनेक कलावंतांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. 21 जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.