pathaan

‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलीज होत आहे. तसेच 26 पासून सुट्टी असलेला लॉंग वीकेंड आहे. त्यामुळ ओपनिंग वीकेंडला 150 ते 200 कोटींची कमाई करण्याची संधी ‘पठाण’ला आहे.

  शाहरुख खान, (Shahrukh Khan) दीपिका पादुकोण (Deepika Padukon) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारीला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होत आहे.

  3 लाख 500 तिकीटांची विक्री
  ‘पठाण’ चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकींग (Pathaan Advance Booking) 20 जानेवारीपासून सुरु झालं आहे. आत्तापर्यंत साधारण 3 लाख 500 तिकीटांची विक्री झाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कालावधीनंतर ‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींग चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकींगचे आकडे जवळपास सारखेच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 23 जानेवारीला ‘पठाण’ चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ला या बाबतीत ओव्हरटेक करेल. ॲडव्हान्स बुकींगबद्दल बोलायचं तर 18 कोटींची कमाई आधीच ‘पठाण’मे खिशात टाकली आहे. चित्रपट ओपनिंग वीकेंडला 150 ते 200 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.

  रिपोर्टनुसार,‘पठाण’ चित्रपटाचं 58 टक्केपेक्षा जास्त ॲडव्हान्स बुकींग झालेलं आहे. ‘केजीएफ 2’चा रेकॉर्डही हा चित्रपट मोडू शकतो. ‘केजीएफ 2’ने साधारण 20 कोटींची रक्कम ॲडव्हान्स बुकींगमध्ये मिळवली होती.

  शाहरुख खानचं फॅन फॉलोइंग बंगालमध्ये जास्त आहे. त्यामुळे बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये जोरात ॲडव्हान्स बुकींग सुरु आहे. पंजाब आणि गुजरातमध्येही ॲडव्हान्स बुकींगचा वेग थोडा कमी आहे.

  लाँग वीकेंडचा फायदा
  ‘पठाण’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलीज होत आहे. तसेच 26 जानेवारीपासून सुट्टी असलेला लाँग वीकेंड आहे. त्यामुळ ओपनिंग वीकेंडला 150 ते 200 कोटींची कमाई करण्याची संधी ‘पठाण’ला आहे. जर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्येच चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

  पठाण चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे बजेट मोठे आहे आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला जवळपास दुप्पट कमाई करावी लागेल, तरच ती एक फायदेशीर गोष्ट असल्याचे सिद्ध होईल. एक प्रकारे शाहरुख खानची स्टार पॉवरही या चित्रपटातून दिसणार आहे.

  ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी यापूर्वीच रिलीज झाली आहेत. चित्रपटात अ‍ॅक्शनही जबरदस्त आहे. शाहरुख खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा आहे. परदेशातही पठाणचा जलवा दिसत आहे. अमेरिकेत पहिल्या दिवशी तिकीट बुकींगमधून 2.4 कोटी रुपये प्राप्त झाले होते.