स्कँडल, रिॲलिटी शो आणि बरंच काही…लव्ह, सेक्स और धोखा 2 चा टिझर रिलीज!

'एलएसडी २' चे कथानक कॅमेऱ्यांसाठी तयार होत असलेल्या रिॲलिटी शोवर केंद्रित आहे

    गेल्या अनेक दिवसापासून लव्ह सेक्स और धोखा 2 (LSD 2 ) चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. नुकताचं या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. 2010 मध्ये रिलीज झालेल्या लव्ह, सेक्स और धोखा या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा एक ॲडल्ट चित्रपट असून या चित्रपटात रिॲलिटी शो,स्कँडल बरंच काही पाहायला मिळणार आहे. तसेच टीझरमध्ये ट्रान्सजेंडर कॅरेक्टर दाखवण्यात आले आहे जो एका रिॲलिटी शोचा भाग आहे. आणि हा टिझर पाहून तुम्हाला रिॲलिटी शो पाहून ‘बिग बॉस’सारखे शो आठवतील.

    दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ (एलएसडी) चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. एमएमएस घोटाळ्यांवरून ‘एलएसडी’च्या कथानकाची कल्पना दिबाकरला सुचली असावी. ‘एलएसडी २’ चं कथानक कॅमेऱ्यांसाठी तयार होत असलेल्या रिॲलिटी शोवर केंद्रित आहे. लोकांच्या आयुष्यावर छुप्या पद्धतीने लक्ष ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या डोळ्यांतून त्यांनी या चित्रपटात वास्तवातील ट्विस्ट आणि टर्न दाखवले आहेत. तर टीझरमध्ये अशी अनेक दृश्ये आहेत जी तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. टीझरपूर्वी दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी एका व्हिडिओमध्ये खास डिस्क्लेमर दिला होता. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहू नका, मुलांना यापासून दूर ठेवा आणि खुल्या मनाने विचार करा, असे त्यांनी सांगितले. ‘LSD 2’ चा टीझर पाहिल्यानंतर दिबाकरने हा इशारा का दिला असेल ते समजेल. हा चित्रपट 19 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    यूजर्सकडून ट्रोल

    सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. या टीझरबाबत एका यूजरने लिहिले आहे की, “या लोकांनी आजच्या तरुण पिढीला बरबाद करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थर्ड क्लास”. आणखी एका युजरने लिहिले की, “यार, तू हे काय केलंस?”