Sahela re

‘एक्स्पो २०२० दुबई’मध्ये अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मृणाल(Mrinal Kulkarni) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आगामी चित्रपटाचा टिझर (Sahela Re Teaser)लाँच करण्यात आला. या चित्रपटाचं शीर्षक ‘सहेला रे’ विचार करायला लावणारं आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’(Sahela Re) या वेब फिल्मची निर्मिती अक्षय बर्दापूरकरनं केली आहे.

    आपल्या सहजसुंदर अभिनयानं मागील बऱ्याच वर्षांपासून मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही मोहिनी घालणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा एका नव्या रूपात समोर येणार आहे. ‘रमा माधव’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘ती अँड ती’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या मृणाल यांचा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    ‘एक्स्पो २०२० दुबई’मध्ये अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत मृणाल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आगामी चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला. या चित्रपटाचं शीर्षक ‘सहेला रे’ विचार करायला लावणारं आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या वेब फिल्मची निर्मिती अक्षय बर्दापूरकरनं केली आहे. या चित्रपटात मृणाल यांनी मुख्य भूमिकाही साकारली असून, सोबत सुबोध भावे आणि सुमित राघवन हे आघाडीचे कलाकारही आहेत. त्यामुळंच या चित्रपटाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

    ‘सहेला रे’ या चित्रपटाच्या निमित्तानं मृणाल, सुबोध आणि सुमित या तीन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जणू जुगलबंदीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. प्लॅनेट मराठीची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखनही मृणालनंच केलं आहे. चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यातच आहेत.