sonali kulkarni tamasha muhurt

संजय जाधव(Sanjay Jadhav) दिग्दर्शित आणि सचित पाटील(Sachit Patil), सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा (Muhurt Of Tamasha Live Movie) नुकताच मुंबईत संपन्न झाला.

    काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी (Planet Marathi)आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि एस. एन. प्रॉडक्शन सहनिर्मित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live)या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. पोस्टरवरूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. संजय जाधव(Sanjay Jadhav) दिग्दर्शित आणि सचित पाटील(Sachit Patil), सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा (Muhurt Of Tamasha Live Movie) नुकताच मुंबईत संपन्न झाला.

    संजयची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. दिवाळी २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तमाशा लाईव्ह’ची अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी निर्मिती केली आहे.  सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं सचितनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

    या चित्रपटाबाबत संजय जाधव म्हणाले की, सोनाली आणि माझी सुरुवातीपासूनच मैत्री असल्यानं त्याचा फायदा आम्हाला काम करतानाही होत आहे. सोनाली उत्तम अभिनेत्री असल्यानं तिच्या कामाबद्दल अधिक बोलण्याची गरजच नाही. सचितचा अभिनयही आपण सर्वांनीच पाहिला आहे. प्रथमच तो निर्मात्याची धुराही सांभाळत आहे. ‘प्लॅनेट मराठी’सोबत हा माझा दुसरा प्रोजेक्ट आहे. त्यामुळं एकंदरच ‘तमाशा लाईव्ह’साठी मी खूपच उत्सुक आहे.