लालबागच्या राजानंतर अंबानी कुटुंबियांनी घेतंल सिद्धिविनायकचं दर्शन, खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

मुकेश आणि नीता अंबानी यांनी कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं.

    सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आहे. नुकतंच मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला कलाकार मंडळी, राजकीय क्षेत्रातील मंडळी ते उद्योग जगतातली दिग्गजांनी हजेरी लावली होती.  उद्योगपती  मुकेश अंबानी यांनीही नुकतंच लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं. आता त्यांनी कुटुंबासह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात (Ambani At Sidhhivinayak Temple) गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा अनंत, मुलगी ईशा आणि नातवंडे दिसले. या दरम्यान त्यांनी आपल्या नातवाला आपल्या मांडीवर घेतले आणि विनायक जी (सिद्धिविनायक मंदिरातील अंबानी कुटुंब) यांचे दर्शन घडवले. या खास क्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    सिद्धिविनायक मंदिरात अंबानी कुटुंब

    अंबानी कुटुंब पुर्वीपासून सिद्धिविनायकाची विशेष भक्ती करतात. रविवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात मुकेश आणि नीता अंबानी कुटुंबासोबत आल्यावर विशेष वातावरण पाहायला मिळाले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मंदिरात प्रवेश करून पूजा करण्याचा एक खास क्षण आहे. मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशाची मुले कृष्णा आणि आदिया यांना मंदिराच्या पुजाऱ्याकडे सुपूर्द करून बाप्पाच्या चरणी नतमस्तक करु दिले. यानंतर पुजाऱ्याने पूजेसाठी आणलेले कपडे परमेश्वराच्या चरणी ठेवले आणि अंबानी कुटुंबियांना प्रसाद दिला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    अंबानी कुटुंबाची सिद्धिविनायकवर नितांत श्रद्धा

    सिद्धिविनायक मंदिरात ईशा अंबानी गुलाबी रंगाच्या कपड्यात दिसली. नीता अंबानीही आपल्या मुलीसोबत मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत. अंबानी कुटुंब सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अंबानी कुटुंबाची गणेशावर नितांत श्रद्धा आहे. मुकेश अंबानी खास प्रसंगी बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.