मुलाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नीता-मुकेश अंबानींनी केला डान्स, राधिकासोबत अनंतचीही खास केमिस्ट्री, पाहा व्हिडिओ!

  अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग फंक्शन धुमधडाक्यात सुरू आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या रंगारंग कार्यक्रमाची संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. शनिवारी या सोहळ्यात सगळं बॅालिवूड अवतरलं होतं. शाहरुख खानपासून तर रणवीर दिपीका, जान्हवी कपूर सगळ्यांनी अख्ख स्टेज गाजवलं. या सोहळ्यात मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांनीही सोबत डान्स (Mukesh and Nita Ambani’s romantic dance performance) केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही त्यांचं कौतुक करत आहेत.

  नीता-मुकेश अंबानींनी केला डान्स

  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये खूप खुश दिसत होते. या सोहळ्यात दोघांनीही स्टेजवर धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला. जे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, राज कपूरच्या ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या आयकॉनिक गाण्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी शानदार डान्स केल्याचं दिसून येतं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

  यावेळी मुकेश अंबानी यांनी कुर्ता-पायजमा घातला होता, तर नीता अंबानी सोनेरी रंगाच्या डान्स केला. यावेळी दोघांची खास केमिस्ट्रीही पाहायला मिळाली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ambani Family (@ambani_update)

  या जोडप्याच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक बड्या सेलिब्रिटींसह बॉलिवूडपासून हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतचे सर्व बडे स्टार्स सहभागी झाले होते. नीता अंबानी यांनीही त्यांची मुलगी ईशा अंबानीसोबत परफॉर्म केलां. आई आणि मुलीच्या डान्सवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.