सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश, गोळीबारात वापरलेले दुसरे पिस्तूलही जप्त!

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेत वापरलेली दोन्ही पिस्तुले जप्त केली आहेत.

    १४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील  गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी गोळीबार  (Salman Khan House Firing Case) केला. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी सूरतमधील तापी नदीतून एक बंदूक आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली होती तर दुसऱ्या बंदुकीचा शोध सुरू होता. तपास सुरू असताना मुंबई गुन्हे शाखेला मोठे आता यश मिळाले आहे. आज मंगळवारी दुसरे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.  दुसऱ्या पिस्तुलासह तीन काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

    सोमवारी सापडलं पहिलं पिस्तूल

    सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवल्यानंतर  सोमवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सुरतला पोहोचले.  चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पिस्तूल तापी नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले. यानंतर टीम सुरतला पोहोचली. सोमवारी त्यांच्याकडून घटनेत वापरलेले पिस्तूल जप्त केले. त्यासोबत काही काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. आज दुसरे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

    गोळीबार प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची कोठडी

    रविवारी , 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घरावर दुचाकीवर आलेल्या आरोपींनी गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन्ही आरोपी गोळीबार करून पळताना दिसले. दरम्यान पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींचा मागोवा घेत त्यांना गुजरातच्य भुज येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता मुंबई गुन्हे शाखेने आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. आत पोलीस त्यांनी कसुन चौकशी करणार आहेत.