मुनावर फारुकी ठरला बिग बॉस सीझन 17 चा विजेता! ट्रॉफी, कारसह मिळाले ‘इतके’ लाख रुपये

रविवारी बिग बॉस 17 चा फिनाले पार पडला. सीझन 17 मुनावर फारुकीने जिंकला आहे. सलमान खानने हात वर करून विजेत्याच्या नावाची घोषणा केली. टॉप 2 मध्ये त्याच्यासोबत अभिषेक कुमार होता.

  बिग बॉस सीझन 17 (Bigg Boss 17) मुनावर फारुकीनं आपल्या नावावर केला आहे. सगळ्यांना मागे टाकत मुनव्वरने यंदाच्या सिझनचा विजेता (Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui) ठरला आहे. सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. मुनावरला ट्रॉफीशिवाय, 50 लाख रुपये आणि ह्युंदाई क्रेटा कार बक्षीस म्हणून जिंकली. त्याच्यासोबत टॉप 2 मध्ये अभिषेक कुमार होता. या दोघांशिवाय अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी फिनालेमध्ये पोहोचले होते.

  मुनावरचा बिग बॉसमधील प्रवास कसा होता?

  सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे आणि पहिल्या आठवड्यापासून तो लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुनव्वरचा खेळ सुरुवातीपासूनच जबरदस्त होता. त्याने आपल्या कविता आणि वन लाइनर्ससह संपूर्ण हंगामात वर्चस्व गाजवले. शोच्या आधीही अनेक पोल मुनव्वर या शोचा विजेता ठरणार असल्याचे संकेत देत होते. मध्यंतरी त्याचा खेळ नक्कीच थोडा कमकुवत झाला, पण जेव्हा सलमान खानने त्याच्याकडे लक्ष वेधले तेव्हा त्याने आपला खेळ सुधारला. त्यानंतर आयशा खानच्या एंट्रीने मुनव्वरच्या आयुष्यात भूकंप आणला. त्याने तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  मुनव्वर बद्दल काही खास गोष्टी

  मुनावरचा जन्म गुजरातमधील जुनागढ येथे झाला. नंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. तो व्यवसायाने स्टँड अप कॉमेडियन आहे. तो 14 वर्षांचा असताना त्याची आई वारली. सुरुवातीला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी अनेक लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. भांड्याच्या दुकानातही तो कामाला होता. 2020 मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले. मुनव्वरने 2017 मध्ये लग्न केले आणि काही काळानंतर वेगळे झाले. त्याला एक मुलगा आहे.

  बिग बॉसच्या आधी कॉमेडियन एकता कपूरच्या ‘लॉकअप’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. हा शो कंगना राणौतने होस्ट केला होता. तो या शोचा विजेता ठरला. या सगळ्यांसोबत मुनव्वर हा रॅपरही आहे. तो गाणी लिहितो. त्याचे अनेक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाले आहेत.