शुभमन गिलसोबत दिसला मुनव्वर फारुकी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आता मुनव्वरचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत दिसत आहे.

    बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकी सध्या प्रचंड चर्चेत आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर तो यशाचा आनंद घेत आहे आणि खूप पार्टी करत आहे. मुनव्वर फारुकी याच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता मुनव्वरचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो भारतीय क्रिकेटर शुभमन गिलसोबत दिसत आहे.

    व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मुनव्वर फारुकी आणि शुभमन गिल एकत्र पोज देताना दिसत आहेत. दोघेही काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. शुभमन गिलने काळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यावर निळ्या आणि केशरी रंगाची प्रिंट आहे. तर मुनव्वर साध्या काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोत राघव शर्माही दिसत आहे. त्यानेच हा फोटो शेअर केला आहे.

    नुकतीच बिग बॉस 17 ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बिग बॉस 17 चे सर्व स्पर्धक दिसले. अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, जिग्ना व्होरा, रिंकू धवन यांच्यासह स्टार्स या पार्टीत सहभागी झाले होते.

    मुनव्वरच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगायचे तर तो या शोचा विजेता ठरला. चाहत्यांनी त्याला भरभरून मतदान केले. सुरुवातीला मुनव्वर शोमध्ये खूपच कंटाळवाणा दिसत होता. मात्र, हळूहळू मुनव्वर शोमध्ये दिसू लागला. शोमध्ये आयशा खानच्या एन्ट्रीने कथेत ट्विस्ट आले. आयशाने मुनव्वरवर अनेक आरोप केले होते. यानंतर मुनव्वरने स्वतः आपली चूक मान्य करत आयेशाची माफी मागितली. मुनव्वर यांना चाहत्यांनीही साथ दिली.