अखेर राज अनादकट सोबतच्या लग्नाच्या अफवांवर बोलली मुनमुन, फेक न्यूजवर स्टोरी शेअर करून म्हणाली….

मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिनं म्हण्टलं की तिची एंगेजमेंट झालेली नाही.

  तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कॉमेडी शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी सोशल मिडीयावर अफवा पसरली होती की शोमध्ये जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) याच्याशी तिची एंगेजमेंट झाली आहे. मात्र, नंतर अभिनेत्रीच्या टीमने या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राजने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या अफवा निराधार असल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता मुनमुनने या बातम्यांवर मौन सोडलं आहे.

  काय म्हणाली मुनमुन

  मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर स्टोरी शेअर करत म्हण्टलंय की, तिची एंगेजमेंट झालेली नाही. या ‘खोट्या बातम्या कशा वणव्यासारख्या पसरतात आणि बूमरँगप्रमाणे परत येत राहतात हे विचित्र आहे. गोष्टी पुन्हा बरोबर कराव्या लागतात. मी लग्न केलेले नाही, मी विवाहित नाही, मी गर्भवती नाही. असं ती म्हणाली.

  याशिवाय तीने म्हण्टलं की ‘मी जेव्हाही लग्न करेन, मग तो तरुण असो किंवा मोठा, मी अभिमानाने करेन. ‘आता मी माझी ऊर्जा बनावट गोष्टींमध्ये गुंतवणार नाही. आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे वाटचाल. देव दयाळू आहे आणि जीवन सुंदर आहे.दरम्यान, राज अनादकट यांनी या अफवा फेटाळून लावत म्हटले की, ‘सर्वांना नमस्कार. फक्त गोष्टी स्पष्ट करण्यासाठी, आपण सोशल मीडियावर पहात असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.

  याआधीही पसरली होती अफवा

  2021 मध्ये, जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या, तेव्हा दोन्ही स्टार्सनी त्याबद्दल वक्तव्ये जारी केली होती. ‘माझ्याबद्दल सतत लिहिणाऱ्या प्रत्येकाने तुमच्या खोट्या गोष्टींचा माझ्या आयुष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा’ असं राज म्हणाला होता. तर, मुनमुनने निराशा व्यक्त करत म्हण्टले होते की,  मला लोकांकडून चांगल्या अपेक्षा आहेत.