munna_bhai mbbs

मुन्ना भाई एम.बी.बी.एस चित्रपटाचा तिसरा भाग येणार अशी चर्चा आहे. मुन्नाभाईचे चाहते देखील या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र अत्तापर्यंत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण आता मुन्ना भाई एम.बी.बी.एसमधील सर्किट म्हणजे अर्शद वारसीने एक खुलासा केला आहे. अर्शदने एका न्यूज पोर्टलला ‘मुन्ना भाई ३’बाबत मोठी माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

अर्शदने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुन्ना भाई ३’ची एक नाही तर तीन स्क्रीप्ट तयार आहेत. पण चित्रपट प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अर्शद स्वतः विचार करत आहे की, ‘मुन्ना भाई ३’ची शूटिंग का सुरू होत नाही आहे. जर स्क्रिप्ट तयार आहे, निर्माता पैसे देण्यास तयार आहेत, अशा परिस्थिती चित्रपटाची शूटिंग का सुरू होत नाही, असा प्रश्न अर्शदने उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या अर्शद ‘मुन्ना भाई ३’बाबत नाराज असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी अर्शद ‘मुन्ना भाई ३’ कधीच येऊ शकणार नाही. त्याने लोकांना असे आवाहन केले होत की, राजकुमार हिरानीला विचारा की, चित्रपटावर काम सुरू का नाही करत? असं रागाने म्हणाला होता.

View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

मुन्ना भाईच्या मेकर्सने चित्रपटाची आइडिया केली आहे आणि लवकरच यावर काम सुरू केले जाऊ शकते. परंतु मार्च संजय दत्तच्या प्रकृतीमुळे चित्रपटाचे काम पुढे ढकलले. २००३मध्ये ‘मुन्ना भाई’ सीरिजची सुरुवात झाली होती. यानंतर चित्रपटाचा सेकेंड पार्टपण आला होता, जो सुपरहिट झाला होता. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढत गेली, परंतु ‘मुन्ना भाई ३’ केव्हाच प्रदर्शित झाला नाही.