माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’, टिकेनंतर आता सुबोध भावेचं स्पष्टीकरण

तसेच संपूर्ण भाषण पाहिल्यावर तुम्हाला त्याच चूकीचं वाटलं तर मी क्षमाही मागतो, असंही भावेंनी नमूद केलं आहे.

    मुंबई : एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता सुबोध भावेनं राजकारण्याबद्दल केलेलं वक्तव्य त्याच्या अगंलट आलं होत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे,’ अशी त्याने खंत व्यक्त केली होती. आता त्याने याबाबत स्प्ष्टीकरण दिलं असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं म्हंटलंय. तसेच संपूर्ण भाषण पाहिल्यावर तुम्हाला त्याच चूकीचं वाटलं तर मी क्षमाही मागतो, असंही त्याने नमूद केलं आहे.

    काय म्हणाला होता सुबोध भावे

    आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे,’ अशी खंत व्यक्त करत अभिनेते सुबोध भावे यांनी रविवारी राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले. देश निर्माण करायचे असेल, तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    सुबोध भावेचं स्पष्टीकरण

    नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ, (कुठेही कट न करता जसाच्या तसा). आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.