भारतीय संगीतानं अख्खा जगाला लावलं वेड, ऑस्करच्या मंचावर नाटु नाटुवर थिरकले परदेशी नागरिक!

अमेरिकन अॅक्टर-डान्सर लॉरेन गॉटलीब देखील ट्रॅककडे वळताना दिसली. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या गाण्याचे गुण प्रेक्षकांसमोर स्पष्ट केले आणि एक धमाकेदार गाणे असल्याचे वर्णन केले. सर्वांनी उभे राहून या गाण्याचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या.

लॉस एंजेलिस येथे ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात RRR  चित्रपटातील नाटु नाटु गाण्याला (Natu Natu Song)सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. पुरस्कार सोहळ्यातही हे गाणे गाजले. परदेशींनी या गाण्यावर स्टेजवर परफॉर्म केले आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित RRR चित्रपटाच्या ‘नाटु नाटु’ च्या परफॉर्मन्सला ऑस्कर अवॉर्ड्समध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. दीपिका पदुकोणने ‘नाटु नाटु’ असा उल्लेख करताच सभागृहात एकच जल्लोष झाला.

ऑस्करच्या मंचावर नाटु नाटु या गाण्यावर परदेशी नर्तकांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले तेव्हा हा क्षण श्वास रोखून धरणारा होता. अमेरिकन अॅक्टर-डान्सर लॉरेन गॉटलीब देखील ट्रॅककडे वळताना दिसली. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या गाण्याचे गुण प्रेक्षकांसमोर स्पष्ट केले आणि एक धमाकेदार गाणे असल्याचे वर्णन केले. सर्वांनी उभे राहून या गाण्याचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या.

 

 ‘नाटु नाटु’  या गाण्याने पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटू लागला आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर RRR ची संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  या बातमीनंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून गेली. प्रत्येकजण आपला आनंद व्यक्त करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक या क्षणाचा आनंद घेत आहेत. साऊथचा मेगास्टार चिरंजीवीने RRR च्या  ‘नाटु नाटु’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या आनंदाच्या प्रसंगी अभिनेता चिरंजीवीने सोशल मीडियावर ट्विट करून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.