नागपुरच्या ऋतुराज वानखेडेनं पदार्पणात पटाकवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार!

ज्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो. त्यांच्या नावाचे झेंडे मिरवत राजकारण्यांच्या नादी लागून जे करतो ती मुळीच महापुरुषांची शिकवण नाही. आजच्या पिढील त्याचं भान राखण्याची गरज आहे. जंयती साजरी करण्यामागचा मुळ उद्देश समजून घेण्याचा संदेश देणारा वेगळ्या धाटणीचा हा विषय लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी चित्रपटात मांडला होता. या चित्रपटात संत्याची भूमिका साकाणाऱ्या अभिनेता ऋतुराज वानखेडेनं पदापर्णातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरलयं

  मुंबई : मराठी सिने कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतींचा गौरव करणारा ‘फिल्म फेअर पुरस्कार सोहळा’ (Filmfare Awads) नुकताच पार पडला. या सोहळ्यात अंकुश चौधरीला ‘धुरळा’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘जयंती’ (Jayanti) चित्रपटासाठी पदापर्णातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार अभिनेता ऋतुराज वानखेडेनं (Ruturaj Wankhede) पटकावलायं. सई ताम्हणकरने ‘धुरळा’ सिनेमासाठी आणि नेहा पेंडसेली ‘जून’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालायं.

  महापुरुषांच्या वैचारीक मंथनाची जंयती साजरी करण्याचा संदेश समाजाला देणाऱ्या ‘जयंती’ (Jayanti) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या नवोदित अभिनेता ऋतुराज वानखेडेनं पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ज्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो. त्यांच्या नावाचे झेंडे मिरवतो, राजकारण्यांच्या नादी लागून जे करतो ती मुळीच त्या महापुरुषांची शिकवण नाही. आजच्या पिढील त्याचं भान राखण्याची गरज आहे. महापुरुषांची जंयती साजरी करण्यामागचा मुळ उद्देश समजून घेण्याचा संदेश देणाच्या वेगळ्या धाटणीचा हा विषय लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी चित्रपटात मांडला होता. महापुरुषांच्या महतीपासून अनभिज्ञ असलेला आणि फक्त त्यांची जयंती साजरी करण्याची एक वेगळी उर्मी अंगी असलेला माणसाची भूमिका अभिनेता ऋतुराज वानखेडेनं साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पंसती मिळाली होती.

  फिल्म फेअर मराठी पुरस्कार 2021 

  सर्वोत्कृष्ट सिनेमा – झिम्मा आणि कारखानीसांची वारी

  सर्वोत्कृष्ट अभिनेता – अंकुश चौधरी (धुरळा)

  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सई ताम्हणकर (धुरळा), नेहा पेंडसे (जून)

  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मंगेश जोशी (कारखानीसांची वारी)

  सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण) – ऋतुराज वानखेडे (जयंती), विराट माडके (केसरी)

  सर्वोत्कृष्ट बालकलाकार – रमण देवकर (म्होरक्या)

  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ जाधव (धुरळा)

  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सोनाली कुलकर्णी (धुरळा), गीतांजली कुलकर्णी (कारखानीसांची वारी)

  सर्वोत्कृष्ट कथा – अच्युत नारायण