naiyo lagda song release of kisi ka bhai kisi ki jaan

 ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं झी म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. ‘नय्यो लगदा’ या गाण्यातील सलमान आणि पूजाच्या लूक आणि केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

    सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) मधील ‘नैयो लगदा’ या पहिल्या गाण्याचा टीझर समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली. अशातच बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘नैयो लगदा’ हे गाणं अखेरीस रिलीज करण्यात आलं आहे. ‘नैयो लगदा’(Naiyo Lagda Song) हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलं असून याचे लिरिक्स शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच पलक मुच्छल यांनी हे गाणं गायलं आहे.

    सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

    ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील ‘नय्यो लगदा’ हे गाणं झी म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. ‘नय्यो लगदा’ या गाण्यातील सलमान आणि पूजाच्या लूक आणि केमिस्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारे तो रिलीज करण्यात येणार आहे.

    ‘किसी का भाई किसी की जान’ व्यतिरिक्त ‘टायगर-3’ (Tiger 3) या सलमानच्या आगामी सिनेमाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. टायगर-3 या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सलमान हा ‘किक-2’ आणि ‘नो एंन्ट्री’ या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची मेजवानीच आगामी काळात मिळणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.