nakul mehta

‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Achhe Lagte Hain) मालिकेतील अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

  बॉलिवूडकरांना कोरोनाने विळखा घातल्यानंतर आता मालिकेतील कलाकारांनाही कोरोनाची लागण(Nakul Mehta  Tested Corona Positive) झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Achhe Lagte Hain) मालिकेतील अभिनेता नकुल मेहताला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

  नकुल मेहताने सोशल मीडियावर कोरोनाची लढाई लढत असल्याची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना तब्येतीबाबतही सांगितले आहे. यातील पहिल्या फोटोत काही गोळ्या दिसत आहेत. त्यानतंर दुसऱ्या फोटो नेटफिल्क्स आणि तिसऱ्या फोटोत गरम गरम जेवण दिसत आहे. त्यानंतर नकुलने स्वत:चा एक सेल्फी शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तो कशाप्रकारे कोव्हिडला मात देत आहे हे त्याने सांगितले आहे. “विल स्मिथ, गोळ्या, नेटफ्लिक्स, स्फॉटिफाय, अली सेठीचा आवाज, ख्रिसमस लाईट्स, माझी डायरी आणि माझ्या घरातल्या बाईने बनवलेले जेवण हे सर्व मला कोव्हिडवर मात करण्यासाठी मदत करत आहे,” असे नकुलने लिहिले आहे.

  नकुल मेहता हा दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. नुकतंच तो ‘बडे अच्छे लगते हैं २’ मध्ये दिसला होता. यापूर्वी त्याने ‘इश्कबाज’ मालिकेत भूमिका साकारली आहे.