चाहत्याला कानाखाली वाजवल्याने नाना पाटेकर ट्रोल; व्हिडिओ व्हायरल होताच माफी मागत म्हटलं…

अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या वाराणसीत जर्नी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या दरम्यान नाना पाटेकरची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला नाना पाटेकरने कानाखाली मारली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत आहे.

    मुंबई : अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या वाराणसीत जर्नी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या दरम्यान नाना पाटेकरची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला नाना पाटेकरने कानाखाली मारली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होत आहे. याच व्हिडिओवरून नाना पाटेकर यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. असे असताना नाना पाटेकर यांनी व्हिडिओ जारी करत यावर माफी मागितली.

    नाना पाटेकर यांनी कानाखाली वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. असे असताना आता त्यांनी यावर माफी मागितली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ”एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे मी एका मुलाला मारले आहे. हा आमच्या सिनेमाच एक भाग असल्याचे मला वाटले. याच बाबत एका सीनचे शूटिंगही झाले होते. पण डायरेक्टरने आणखी एक रिहर्सल घेण्याचे सांगितले होते. जेव्हा रिहर्सल सुरू होती नेमकं त्याच दरम्यान तो मुलगा पुढे आला”.

    ”मला वाटलं की तो आमचाच क्रू मेंबर आहे. पण नंतर मला जेव्हा कळलं की तो चाहता आहे. तेव्हा त्याला मी आवाज दिला. थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो लगेच निघून गेला होता. त्यामुळे मला त्याला भेटता आलं नाही”.

    गदर-2 फेम दिग्दर्शक अनिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करण्यात गुंतले आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘जर्नी’ या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माही काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीपासून सुरू आहे. या चित्रपटातील एका सीनदरम्यानच हा प्रकार घडला होता.